कंपनी कायदा २०१३ नुसार कंपन्यांना त्यांचे नफ्याच्या २% हा CSR वर खर्च करणे बंधनकारक आहे. CSR म्हणजे Corporate Social Responsibility. भारतातील ज्या काही कंपन्या आहे त्यांना सामाजिक जबादारी म्ह्णून त्यांनी मिळविलेल्या नफ्याच्या २% भाग हा विविध सामाजिक कार्यासाठी वापरावयाचा आहे यालाच CSR असे म्हणतात.
- कुठल्या कंपन्याना CSR खर्च करणे अनिवार्य आहे: खालील पैकी कोणतीही एक बाब ज्या कंपनीची असेल त्या कंपनीला CSR खर्च बंधनकारक आहे.
- ज्या कंपनीची नेटवर्थ रु. ५०० कोटी पेक्षा जास्त आहे किंवा
- ज्या कपंनीची वार्षिक उलाढाल रु. १००० कोटी पेक्षा जास्त आहे किंवा
- ज्या कंपनीचा वार्षिक निव्वळ नफा हा रु. ५ कोटी पेक्षा जास्त आहे.
कंपन्या कश्या खर्च करतात CSR निधी: ज्या काही मोठा व नावाजलेल्या कंपन्या आहे त्यांनी स्वतःचे एक चॅरिटेबल ट्रस्ट / फाउंडेशन / NGO / संस्था स्थापन केलेली आहे व त्या ट्रस्ट मार्फत विविध समाजउपयोगी कामे केले जातात व त्यासाठी तो CSR निधी वापरला जातो. जसे कि टाटा ट्रस्ट, रिलायन्स फाउंडेशन ई. ह्या संस्था इतर संस्थांसोबत सुद्धा काम करतात व त्यांना निधी उपलब्ध करून देतात. अनेक मोठ्या कंपन्या आहे त्यांच्या स्वतःच्या चॅरिटेबल ट्रस्ट किंवा संस्था आहे त्या आपल्याला त्यांच्या वेबसाईटवर जाऊन शोधता येतील.? छोट्या संस्थांनी हा मोठ्या कंपन्यांचा सीएसआर निधी कसा मिळवायचा.
- छोट्या संस्थांना सुद्धा हा सीएसआर निधी मिळवता येईल परंतु त्यासाठी काही लिगल गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे त्या खालील प्रमाणे आहेत:
- तुमचे ट्रस्ट किंवा संस्था ही धर्मादाय आयुक्त ऑफिसला नोंदीत असावी किंवा कंपनी कायद्याखाली नोंदीत सेक्शन ८ कंपनी असावी.
- तुमची संस्था ही आयकर कायद्याच्या कलम 12A खाली नोंदीत असावी.
- तुमच्या संस्थेला आयकराचे 80G सर्टिफिकेट प्राप्त असावे.
- तुमच्या संस्थेची नोंदणी ही निती आयोगाच्या वेबसाईटवर केलेली असावी.
- संस्था अगदीच नवीन नसावी तिला कुठल्यातरी क्षेत्रात काम केल्याचा दोन-तीन वर्षांचा अनुभव असावा.
- जर तुम्हाला भारताबाहेरशील कंपनी कडून निधी / डोनेशन हवे असेल तर तुमची संस्थेला FCRA नोंदणी सर्टिफिकेट असावे.
वरील सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असेल तर तुम्ही ह्या विविध मोठ्या कंपन्यांशी संपर्क साधून त्यांचे कडे असणारा CSR निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकता. सध्या बाजारात खूप सारे असे एजंट फिरत आहेत की जे सांगतात की आम्ही मोठ मोठ्या कंपन्यांचा निधी तुम्हाला मिळवून देऊ परंतु माझ्या अनेक वर्षांच्या अनुभवावरून असे सिद्ध झाले आहे की हे जे एजंट आहे हे थोडेफार पैसे त्या संस्थेकडून उकळतात आणि पुढे काहीच होत नाही त्याचे कारण असे की ज्या काही मोठ्या कंपन्या आहे त्या कंपन्यांच्या टॉप मॅनेजमेंट सोबत त्याचे कोणतेही रिलेशन नसतात व संपूर्ण माहिती त्यांनी घेतलेली नसते.
- तुम्हाला जर मोठ्या कंपन्यांचा निधी मिळवायचा असेल तर त्याची पद्धत साधारण खालील प्रमाणे आहेत:
- प्रत्येक कंपनीची सीएसआर पॉलिसी असते आणि प्रत्येक कंपनीत कंपनीची सीएसआर कमिटी सुद्धा असते.
- त्या कमिटीमध्ये टॉप मॅनेजमेंट चे लोक असतात आणि त्यांना कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर ला रिपोर्ट करावे लागते.
- आपल्याला जर मोठ्या कंपनीचा सीएसआर निधी मिळवायचा असेल तर त्या कंपनीच्या सीएसआर कमिटीची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे आणि त्यात कमिटीमध्ये कोण लोक आहे त्यांच्याशी संपर्क करणे गरजेचे आहे म्हणजे आपली फसवणूक होणार नाही.
- तसेच सदर कंपनीच्या CSR पॉलिसीचा अभ्यास सुद्धा करणे गरजेचे आहे आणि सीएसआर पॉलिसीमध्ये ती कंपनी कुठल्या प्रोजेक्टला महत्त्व देत आहे ते सुद्धा बघितले गेले पाहिजे आणि त्या प्रोजेक्टबद्दल आपल्याला काही अनुभव आहे का हे सुद्धा बघितले पाहिजे.
आता आपण सण २०१९/२० मध्ये वेगवेगळ्या कंपन्यांनी किती सीएसआर खर्च केला हे बघू या: साधारणपणे शेअर मार्केट मध्ये लिस्टेड असणाऱ्या २६९ कंपन्यांनी सन २०१९/२० मध्ये रुपये १० हजार ५९५ कोटी इतका खर्च CSR खर्च केलेला आहे. त्यापैकी ३२ टक्के हा एज्युकेशन आणि स्किल डेव्हलपमेंट वरती खर्च झालेला आहे, २९ टक्के हा रोजगार निर्मिती आणि हेल्थकेअर, वॉटर आणि सॅनिटेशन याच्यावरती खर्च झालेला आहे आणि १२% टक्के हा रूरल डेव्हलपमेंट ह्या क्षेत्रात खर्च झालेला आहे.
यावरून कंपन्या कोणता गोष्टी ला महत्व देत आहे हे लक्षात येते व त्या नुसार आपल्या ट्रस्ट /संस्थेचे कामाचे, सर्व्हिस ऍक्टिव्हिटी चे नियोजन करता येते. साधारण पणे दरवर्षी भारतातील विविध कंपन्या ह्या रु. १ लाख कोटी CSR वर खर्च करतात यावरून याचे महत्व लक्षात येते.
✍️ ब्लाँग लेखन:
प्रा. सीए (डॉ.) एम. एस. जाधव